अवघड काळांचा विसर न पडू देता जगण्याचा, माणसांशी जोडलं राहण्याचा, त्यांच्यासाठी उपस्थित असण्याचा सरावच आपल्याला पुढच्या आयुष्यात तारून नेईल

छोट्या गावातली सगळ्यांच्या सहभागातून केलेली संमेलनं हे सगळ्यांसाठी घरचंच कार्य असतं. लहान पोरासोरांपासून उंबरठा कसाबसा ओलांडू शकणार्‍या सगळ्या वयोज्येष्ठांचा त्यात सहभाग असतो. अलीकडे ज्येष्ठ लेखक विचारवंत भालचंद्र नेमाडेंची मुलाखत घेतली. ते म्हणतात त्यानुसार गावं जगली ती त्यामध्ये गुंतलेल्या व गुंफलेल्या सेंद्रिय संबंधांमुळे. याचा अनुभव घेण्यासाठी गावातल्या जिव्हाळ्याचा पोत समजून घ्यावा लागतो.......